
बातमी कट्टा:- वारंवार तक्रार करुनही संबंधीत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने व्यथित झालेल्या संतप्त शेतकऱ्याने चक्क प्रांताधिकारी कार्यालय बाहेरच दोर बांधून गळफासने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल दि 24 रोजी दुपारच्या सुमारास घडली.

अमळनेर तालुक्यातील निम गावातील शेतकरी सुनील शिवाजी पवार यांनी शेतात केळी पिकाची लागवड केली आहे.मात्र त्यांच्या केळी पिकाच्या क्षेत्रातून वीटभट्टीसाठी मातीची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक होत असतात.अतिप्रमाणात मातीची वाहतूक होत असल्याने धुळी मुळे केळी पिक खराब होत आहे. याबाबत शेतकरी सुनील पवार यांनी अमळनेर तहसीलदारांकडे तक्रार दिली होती.मात्र याकडे दुर्लक्ष झाले.
तलाठीने घटनास्थळी जाऊन चौकशी केली मात्र वाहतूक सुरुच राहिली शेतकऱ्याने प्रांताधिकारी यांना तक्रार दाखल केली.ज्यात घटनास्थळी विट्टांचा ढिग व मातीचा साठा असून प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली.प्रांताधिकारींनी देखील तलाठीला चौकशीसाठी पाठवले मात्र तरी देखील उपयोग झाल नाही. शेतात उभ्या केळीचे नुकसान होत असल्याने शेतकरी तणावात होते.व्यापाऱ्याने शेतकरी सुनील पवार यांच्या शेतातील केळी माल घेण्यास नकार दिला यामुळे संतप्त शेतकऱ्याने काल दि 24 रोजी बाहेरच दोर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी संबधीत प्रशासनाने शेतकऱ्यास ताब्यात घेत घटनास्थळी महसूल पथकाने पंचनामा करत चौकशी केली आहे.
