बातमी कट्टा:- एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात गेल्या 14 दिवसांपासून बससेवा पुर्णता बंद झाले होते.जिल्ह्यातील आगरात सुकसुकाट बघावयास मिळत होता मात्र आज पोलीस प्रशासनच्या बंदोबस्तात धुळे आगारतून बससेवा सुरु करण्यात आली आहे.
एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून लालपरी कुठेही बाहेर पडलेली नव्हती मात्र तब्बल 14 दिवसानंतर पोलिस प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेत एसटी बसेस सुरू करण्यात आली आहेत. आज सकाळी धुळे – नरडाणा आणि धुळे- धनुर या दोन गावांसाठी बस सुरू करण्यात आल्या.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसताना, संप सुरू असताना प्रशासनाने आडमुठ्ठपणाची भूमिका न घेता बसेस सुरू करू नये अशी मागणी मनसे कडून यावेळी करण्यात आली बसेस सोडण्यासाठी मनेसकडून विरोध करण्यात करतांना.मनसे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनामध्ये यावेळी खडाजंगी पाहायला मिळाली.सोडण्यात आलेल्या एसटी अडवण्याचा प्रयत्न यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी आंदोलक एसटी बस कर्मचाऱ्यांनी शासना विरुद्ध जोरदार घोषणा व निदर्शने करण्यात आल्या आहेत.