अन् रितेशला बघताचक्षणी आई वडीलांना आनंदाश्रु

बातमी कट्टा:- माझा छकुला…माझा सोनुला…या मराठी चित्रपटातील गाण्यातील कथेप्रमाणेच आईच्या आठवणीत आश्रमशाळेतून वाट चुकलेल्या चिमुकल्याची कथा समोर आली आहे.दोन दिवसांपासून तो निघून गेल्याने आई वडीलांसह नातेवाईक मंडळी त्याचा शोध घेत होते.सोशल मिडीयावर त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला होता.अनेक कसरती आणि प्राणप्रणाला लावून अखेर तिसऱ्या दिवशी तो मिळुन आला. त्याला पाहताक्षणीच आई आणि वडीलांना आनंदाश्रु अनावर झाले आणि त्यांनी चिमुकल्याला मिठी मारली.

शिरपूर तालुक्यातील लौकी येथे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आहे.तेथे तालुक्यातील मोहिदा येथील 10 वर्षीय रितेश रोहिदास पावरा शिक्षण घेत आहे.त्याचे आई आणि वडील नाशिक येथे कंपनीत कामाला आहेत.रीतेश पहिलीपासूनच लौकी येथील शासकीय आश्रमशाळेत असून तो आता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

त्याला आईची आठवण येत होती.त्याला आईला भेटायच होत.अन अखेर आईला भेटण्यासाठी रितेशने दि 30 रोजी दुपारी 4:15 वाजेच्या सुमारास वॉलकंपाऊंड मधील एका बोगद्यातून आश्रमशाळेच्या बाहेर पळ काढला.आईच्या शोधात निघालेल्या रितेशला आपण कुठे जात आहोत याची काही एक कल्पना नव्हती तो पायीपीट करत आश्रमशाळेपासून दुर निघून गेला.

एकिकडे शाळेतून रितेश हा कुठे गेला असावा याची शोधाशोध घेतली.शाळेतील सी.सी.टी.व्ही कँमेरात बघितले तेव्हा तो वॉलकंपाऊंडच्या बोगद्यातून बाहेर गेल्याचे समजले. शिक्षकांसह सर्वांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.ईकड रितेशचे नातेवाईकांना व आई वडिलांना रितेश आश्रमशाळेतून कोणाला काही एक न सांगता निघून गेला असल्याचे फोनवर सांगण्यात आले.आई वडील नाशिक येथून आश्रमशाळे येऊन त्यांच्यासह सर्वांनी शोधाशोध सुरु केली.अनेक कसरती आणि प्राणप्रणाला लावून शोधाशोध सुरु असतांना अखेर तिसऱ्या दिवशी रितेश हा त्याचे मामा किरण पावरा,संदिप पावरा,मोतीराम पावरा यांना हाडाखेड धरणाजवळील एका झोपडीजवळ दिसून आला.रितेश मिळुन आल्याचे सर्वांना माहिती कळविण्यात आली.सर्वजण रितेशजवळ पोहचले पारखं झालेल लेकरु आईच्या कुशीत आले.त्याला बघुन आई आणि वडीलांना आनंदाश्रु अनावर झाले.

नघटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली.आणि शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी देखील त्याची विचारपूस करत मुलाला आपल्या आईच्या स्वाधीन केले.रितेशचे आश्रमशाळेतील शिक्षकांनी देखील सुटकेचा श्वास घेतला.गेल्या दोन दिवसांपासून शिक्षक विजय चोपडे,किरण मोरे,अतुल बागुल,ज्ञानेश्वर राजपूत, अनिल वाघ,सागर राजपूत, विवेक देसले,आढेकर आदी जण रितेशचा शोध घेत होते.आईची आठवण येत असल्याने आईच्या भेटीसाठी आश्रमशाळेतून बाहेर निघाल्याचे यावेळी रितेशने शिक्षकांना सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: