अपघातनंतर टँकरमधील अत्यंत ज्वलनशील गॅसला गळती, महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली…

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर पलटी झाल्याची घटना घडली.या टँकर मधील गळती होणार गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याचे माहिती मिळताच सर्वत्र धावपळ उडाली.या भागातील दोन किमी पर्यंत परिसरात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला होता.काही वेळ विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.गॅस स्फोट होऊ नये म्हणून कित्येक तास गळतीवर पाणी टाकणे सुरु होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज सायंकाळी मुंबईकडून जळगाव कडे ज्वलनशील गॅस घेऊन जात असलेल्या एका टँकरचा धुळे शहरालगत असलेल्या चाळीसगाव चौफुली जवळ अपघात झाला. अपघातानंतर गॅस गळती सुरू झाली.या टँकरमध्ये 17 हजार लिटर प्रोपेलेंट हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याचे माहिती मिळताच धावपळ सुरु झाली.

शहर वाहतूक शाखेला अपघाताची माहिती मिळाल्याच मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.तर या गॅसचा विस्फोट होऊ नये यासाठी कित्येक तास त्यावर पाण्याचा मारण्यात येत होते.ज्वलनशील गॅस असल्याने या भागातला वीजपुरवठा देखील काही काळ खंडित करण्यात आला होता.तर परिसरातील दोन किलोमीटर परीसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता.गॅस गळती थांबण्यासाठी जळगाव येथील अभियंत्यांना यांना बोलवण्यात आले होते.

WhatsApp
Follow by Email
error: