अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी कट्टा :- अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवर जाणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 7 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बलकुवा येथील आदर्श शेतकरी विलास विनायक बोरसे हे दि 7 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बलकुवा येथून शिरपूरकडे येत असतांना बलकुवा अर्थे रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने विलास बोरसे या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विलास बोरसे यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी व एक भाऊ आणि बहिण होत.शिरपूर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: