बातमी कट्टा:- गुजरात येथून उजैन येथे महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार गुजरातहून नवापूर मार्गे उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार आज दि 5 रोजी सकाळी पांथपिपलाई ते रामवासाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.घटनास्थळी तिन्ही जण कारमध्ये अडकल्याने नागरिकांनी तिघांना कारच्या बाहेर काढत रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघाताची नानाखेडा पोलीस स्टेशनात माहिती देण्यात आली.या अपघातात कार मधील कमलेश मिठालाल खत्री वय 35 धनलक्ष्मी पार्क,नवापूर आणि नितीन ठक्कर वय ३४, सोनगड,गुजरात या दोघांचा मृत्यू झाला तर कार चालक किरण हरीश हे गंभीर जखमी आहेत.