बातमी कट्टा:- कॉलेजमधून मोटारसायकलीने घरी परत येत असतांना तरुण शिक्षकाचा अपघात झाल्याचे आढळले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतांना एक चारचाकी वाहन तेथे येत वाहनातील लोकांनी शिक्षकला घेऊन रुग्णालयात जात असल्याचे उपस्थितांना सांगून ते निघाले मात्र जवळपासच्या कुठल्याच रुग्णालयात तो शिक्षक उपचार घेत असल्याचे आढळून आलेले नाही.घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र शिक्षक मिळुन आला नाही.मग तो अपघातग्रस्त शिक्षक नेमका गेला कुठे ? ते चार चाकी वाहनातील लोक नेमकं कोण होती ? त्यांनी त्या शिक्षकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल नाही केले मग कुठे घेऊन गेले ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.सासरे व शालक यांनी मुलाला पळवल्याचा संशय असल्याची तक्रार वडीलांनी पोलीस स्टेशनात दिली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील तरडी येथील धिरज भाऊराव सोनवणे हे शिरपूर येथील एस.पी.डी.एम कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.दि 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धिरज सोनवणे एम.एच 18 बी.के 5631 क्रमांकाच्या शाईन मोटरसायकलीने कॉलेजला गेले होते.सायंकाळी 5 वाजता कॉलेज सुटल्यावर धिरज सोनवणे मोटरसायकलीने तरडी येथे घरी येत असतांना 5:30 वाजेच्या सुमारास भाटपुरा पोलीस चौकी जवळील नाल्याजवळ त्यांची मोटरसायकल रस्त्याच्या खाली उतरल्याने धिरज सोनवणे रस्त्याच्या कडेला पडले.त्यांच्या मागे चारचाकी विनानंबर वाहन येत होती. धिरज सोनवणे रस्त्याच्या कडेला पडलेले दिसल्याने वाहनातील लोकांनी त्यांना उपचारासाठी शिरपूरच्या दिशेने घेऊन गेल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले.
नातेवाईकांनी धिरज सोनवणे यांचा होळनांथे ,शिरपूर धुळे चोपडा येथील बरेच रुग्णालयात तपास केला मात्र धिरज सोनवणे कुठेही आढळून आले नाहीत.याबाबत धियज सोनवणे यांचे वडील भाऊराव सोनवणे यांनी थाळनेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद केली आहे.ज्यात मुलगा धिरज सोनवणे यांचा कौटुंबिक कारणाने वाद झाला होता. धिरज सोनवणे पत्नीशी 2015 मध्ये न्यायालयात केस चालू असतांना पत्नीला खावटी देण्यात येत आहे.धिरज सोनवणे यांचे सासरे दिलीप चव्हाण व त्यांचा शालक बंटी चव्हाण यांनी तडजोडीसाठी धिरज यांना पळवून नेल्याचा संशय असल्याची तक्रार दाखल करण्यात आला आहे.