अपघात चाळीसगावात, ट्रक पकडला शिरपूरात,अपघातानंतर फरार होणाऱ्या भरधाव ट्रकला शिरपूर महामार्ग पोलीसांनी घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- भरधाव ट्रकने एकाला चाळीसगाव येथे अपघातात चिरडल्याची घटना घडली होती.घटनेनंतर ट्रक तेथून फरार झाला होता.त्या ट्रकला शिरपूर महामार्ग पोलीसांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलवे जवळ ट्रकसह चालक व सहचालक दोघांंना ताब्यात घेतले.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 23 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील खडकी बायपास येथे आर जे ११ जि सी ०५१३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने अशोक मगर या 65 वर्षीय व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरून फरार झाला.याबाबत चाळीसगाव शहर पोलीसांनघ ट्रक शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी धुळे विभाग महामार्ग पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी महामार्ग पोलीसांना ट्रकची माहिती देत कार्यवाही बाबत आदेश दिले.या आदेशानुसार शिरपूर महामार्गावर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार यांच्यासह महामार्ग पोलीस पथक शिरपूर टोलनाका येथे दाखल झाले यावेळी टोलनाका कर्मचाऱ्यांच्या मदतीने चाळीसगाव येथे अपघात करुन फरार होणाऱ्या ट्रकला महामार्ग पोलीसांनी शिताफीने थांबवले व त्यातील चालक जावेद राजू खान वय 24 रा.देवानगरी हरियाणा व सहचालक अरमान निसार खान वय 18 यांना ताब्यात घेतले.दोघांसह ट्रकला चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: