बातमी कट्टा:- अतिबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यवावर असतांना मनोज गायकवाड शहीद झाल्याची दुदैवी घटना घडली होती.त्यांच्या पार्थिवावर आज धुळे तालुक्यातील चिंचखेडा या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
घरापासून तब्बल पाच किमी अंतरापर्यंत अमर रहे अमर रहे शहीद जवान मनोज गायकवाड अमर रहे अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली.तर संपूर्ण गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली.गावातील चौकाचौकात आदरांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.पोलीस दलाच्या व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीचे हवेमध्ये बंदुकीतून अंतिम मानवंदना देण्यात आले.
खासदार सुभाष भामरे,जिल्हाधिकारी जलज शर्मा,आमदार कुणाल पाटील,शिवसेना जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे,माजी आमदार शरद पाटील,पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी अधिकारी संजय गायकवाड आदींसह प्रशासनातील पदाधिकारी आदींनी पुष्पचक्र वाहून मनोज गायकवाड यांना मानवंदना दिली.आई रेखा गायकवाड, वडील लभ्मण गायकवाड,पत्नी रुपाली गायकवाड,मुलगा अथर्व,मुलगी भुमिका भाऊ सचिन आणि भाऊ मिलींद यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.मुलगा अथर्व यांनी पार्थिवला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी येथे उपस्थित होते.