बातमी कट्टा:- निवीदा मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे स्वतासाठी दोन लाख आणि टोलवे कंपनीच्या संचालकासाठी पाच लाख असे तब्बल सात लाख रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारतांना टोलवे कंपनीच्या अकाऊंटन्टींग व फायन्नस अधिकारीला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
इरकॉन सोमा टोल वे प्रा.ली नवी दिल्ली या कंपनीने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या कडून दि २८/९/२००५ रोजी बांधा,चालवा व हस्तांतरित कळा या तत्वावर करारनामा केला आहे. सदर कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपूर,राजस्थान) या कंपनीने दि २२.८.२०२२ रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील चांदवड जि.नाशिक येथील टोल प्लाझाचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे.सदर कंपनीने तक्रारदार यांना दि २५/८ /२०२२ रोजी मुखत्यार पत्राद्वारे टोल प्ला़झा,चांदवड,जि.नाशिकचे संपूर्ण व्यवस्थापन व त्या संबधी कागदोपत्राचे अधिकार प्रदान केले आहेत.
तक्रारदार यांनी कोअर असोसिएटस कंपनीचे चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बददलचे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ चे रिअँम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळींग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निवीदा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दि १९ /०२/२३ रोजी धुळे लळींग इरकॉन सोमा टोलवे चे मुख्य कार्यालयात फायन्नन्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी स्वतासाठी दोन लाख व इरकॉन सोमा टोल व प्रा.ली.नवी दिल्ली चे संचालक प्रदिप कटीयार यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.अशी तक्रार यांनी दि २१ रोजी लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाला तक्रारदार यांनी दिली.
त्या तक्रारीची पडताळणी करत इरकॉन सोमा टोलवे प्रा.ली.नवी दिल्ली या कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार यांनी मोबाईल द्वारे सांगितल्यावरुन कंपनीचे फायन्नन्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी तक्रादाराकडे स्वाता करिता दोन लाख व संचालकासाठी पाच लाख असे एकुण सात लाख रुपयांची पंचासमक्ष मागणी करुन धुळे लळींग येथील इरकॉन टोलवे येथील मुख्य कार्यालयात लाचेची रक्कम स्विकारतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भुषण खलाणेकर,भुषण शेटे,गायत्री पाटील, रोहिणी पवार, रामदास बारेला सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल,मकरंद पाटील आदींनी केली आहे.