बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून धुळ्याकडे तलवारी घेऊन जाणाऱ्या ईर्टीगा वाहनातून १२ तलवारी, दोन गुप्ती, चॉपर, बटनाचा चाकू फायटर व एक इर्टीगा गाडी असा एकुण ६ लाख २९ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गोपीणीय मात्र मिळाली त्या माहितीच्या आधारे दि २३ रोजी दुपारी शिरपूर तालुका पोलीसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला असता हाडाखेड येथे एम.एच ०४ एफ झेड २००४ येथे क्रमांकाची ईर्टीगा वाहन संशयास्पद दिसून आल्याने पोलीसांनी ईर्टीगा वाहनाला थांबवले.इर्टीगा वाहनाची तपासणी केली असता त्यात १२ तलवारी दोन गुप्ती,चॉपर,एअ बटनाचा चाकू फायटर व एक इर्टीगा गाडी असा एकुण ६ लाख २९ हजार किंमतीचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सतपाल गिरधर सोनवणे वय २५ रा लळींग धुळे,किरण नंदलाल दुधेकर वय २७ रा.जुन्नेर ता.धुळे,विकास देवा ठाकरे वय ४० रा.लळींग,सखाराम रामा पवार रा.लळींग,सचिन राजेंद्र सोनवणे वय २७ रा.अवधान धुळे,राजु अशोक पवार वय २६ रा.जुनैर ता.धुळे,विशाल विजय ठाकरे वय २७ रा.लळींग,संतोष नामदेव पाटील वय २२ रा.जुनैर ता धुळे,अमोल शांताराम चव्हाण वय २०,विठ्ठल हरबा सोनवणे वय ३८ रा.लळींग आदी जणांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक कुशोर काळे,पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर,यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशन चे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, जाकीररोद्दीन शेख,चतरसिंग लखा खसावद,पवन रामचंद्र गवळी,संजय सुर्यवंशी आरिफ पठाण, संदीप शिंदे,रोहिदास पावरा,योगेश मोरे,संतोष पाटील, इसरार फारूकी आदींनी कारवाई केली आहे.


