बातमी कट्टा:- शेळ्या चरत असतांना अचानक 12 ते 15 फुट लांब अजगराने एका शेळीवर झडप मारत शेळीला फस्त केले.एवढ्या मोठ्या अजगाराला पाहुन सर्व जण चकीत झाले.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपायरी घाट जवळ सुरेश चौधरी हे त्यांच्या शेळ्या चारायला गेले होते.अचानक त्या शेळ्यांमधील एका शेळीवर भला मोठा 12 ते 15 फूट लांबीचा अजगराने झडप टाकली आणि शेळीला संपूर्ण संपूर्ण गोळ गुंडाळून शेळीला फस्त केली.

या तोरणमाळ वनपरिक्षेत्रात बिबट्याने शळींना ठार केल्याच्या अनेक घटना ऐकून होत्या मात्र चक्क 15 फुटाच्या अजगर शेळी फस्त केल्याची ही पहिलीच घटना सांगितली जात आहे.यामुळे जंगलात पाळीव प्राणी चारण्यासाठी जात असतांना घबरदारी घेणे गरजेचे आहे.