अरे बाप्परे एवढी मोठी चोरी… 15 लाख रोख व 2 लाख किंमतीची मंगलपोत

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील दहीवद येथे धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघड झाली असून बंद घरातून सुमारे 15 लाख रुपये रोख व 2 लाखाची सोन्याची मंगलपोत असा एकुण 17 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.चोरी झाल्याचे पहाटे 5 वाजेच्या सुमारास समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबत आज दि 30 रोजी सायंकाळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिवद येथील नरेंद्र भगवान पाटील वय 49 हे एक महिन्यांपासून संपूर्ण कुटुंबासोबत मुलांच्या शिक्षणासाठी शिरपूर येथे रुम घेऊन राहत आहेत.नरेंद्र पाटील यांच्या दहिवद येथील घराचे बांधकाम सुरु असल्याने नरेंद्र पाटील हे घरी येत होते.काल दि 29 रोजी नरेंद्र पाटील यांनी दहिवद येथील घराला भेट दिली होती.सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या दरवाजा व गेटला कुलुप लावून शिरपूर येथे निघुन गेले होते.मात्र आज दि 30 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास गावाचे पोलीस पाटील रावसाहेब पाटील व जयवंत सिसोदे यांनी नरेंद्र पाटील यांना फोन केला व घराचे लाकडी व लोखंडी दरवाजे व कुलुप उघडे असल्याची माहिती फोन वर दिली.नरेंद्र पाटील हे शिरपूर वरुन दहिवद येथे आले असता त्यांच्या घरातील लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलुप तुटलेले असून दोन्ही दरवाजे उघडे आढळून आले त्यानंतर घरातील आतील तीजोरीच्या खोलीचे कुलुप तुटलेले होते व तीजोरीचा दरवाजा देखील उघडा होता सर्व सामान अस्थाव्यस्थ होता.संपूर्ण तिजोरी रीकामी दिसली व शेती विक्री केल्याचे आलेले 15 लाखांची रोकड व 2 लाख किंमतीचे 53 ग्रँमची मंगलपोत असा एकुण 17 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले.चोरी झाल्याची माहिती प्राप्त होताच सर्वत्र गावातील गर्दी गोळा झाली होती.

घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथक दाखल होऊन चौकशी करण्यात आली.यावेळी फॉरेन्सिकचे पथक,श्वान पथक यांनी घटनास्थळी भेट दिली होती.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांच बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी माने यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली असून पासणी केली आहे.पोलिसांनी परिसरातील सी.सी टी.व्ही फुटेजची तपासणी करत चौकशी केली आहे.दहिवद येथील आणखी एका घरातील दरवाजाचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तेथे कुठल्याही प्रकारची चोरी झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: