बातमी कट्टा:- रस्त्यालगत काटेरी झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आल्याने खळबळ उडाली आहे.हा मृतदेह पुरुषाचा असून याबाबत पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. अमळनेर ते टाकरखेडा रस्त्यालगत शेत शिवारातील फॉरेस्ट कम्पार्ट मधील काटेरी झुडपात आज सकाळी अनोळखी अंदाजे 30 ते 35 वर्षीय पुरुषाचा मृतदेह दिसून आला.हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गणेश पाटील रा.पळासदळे ता.अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयित विरुध्दात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.
मृतदेहाच्या अंगावर अर्धवट जळालेली काळ्या रंगाची जिन्स पँन्ट मिळुन आली आहे.मयताच्या उजव्या हातावर ऊँ.दि.क.श.आ.वि असे गोंढलेले आहे.या वर्णनावरून मृतदेहाची ओळख पटल्यास किंवा मयताच्या मारेकराची माहिती मिळुन आल्यास अमळनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.माहिती देणाराची नाव व गाव गोपणीय ठेवले जाईल व त्याला योग्य ते बक्षीस दिले जाणार असल्याचे अमळनेर पोलीस स्टेशन कडून सांगण्यात आले आहे.