
बातमी कट्टा:- शेतातील बांधाजवळ अर्धवट पुरलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळून आला.पोलीसांनी चौकशी केली असता त्या मृत महिलेची ओळख पटली,फिर्यादीने म्हटले की संशयिताने महिलेला जबरीने घरातून घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्ती केली असावी व त्यानंतर डोक्यात दगड टाकून खून करुन तिचा मृतदेह गाव शिवारातील शेताच्या बांधावर पुरला असावा असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.पोलीसांनी तात्काळ संशयिताला ताब्यात घेतले आहे.

साक्री तालुक्यातील नवडणे येथे गाव शिवारातील शेताच्या बांधावर अर्धवट पुरलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता कपड्यावरून ओळख पटवून सदर महिला नवडणे येथील अनूसया अहिरे वय 23 असल्याचे उघड झाले.याबाबत मृत महिलेचा पती सोनू साहेबराव अहिरे याने साक्री पोलीस स्टेशनात फिर्याद दिली आहे. यात म्हटले की,संशयित अशोक सोनवणे हा नेहमी वाईट नजरेने पाहत असे,म्हणून संशयिताने तिला घरातून घेऊन जाऊन जबरदस्ती केली असावी व त्यानंतर डोक्यात दगड टाकून तिचा खून करत तिचा मृतदेह गाव शिवारातील शेताच्या बांधाजवळ पुरला असावा असा संशय फिर्यादीतून व्यक्त करण्यात आला आहे.पोलीसांनी संशयित अशोक सतीश सोनवणे वय 21 रा.नवडणे याला ताब्यात घेतले आहे.