अलाणे ग्रामपंचायतीचा “आदर्श” ठराव, बघा व्हिडीओ वृत्तांत

On youtube

बातमी कट्टा:- गावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे येत शिंदखेडा तालुक्यातील अलाणे ग्रामपंचायत नेहमीच विविध उपक्रम करत असतात.अशाच एक चांगला ठराव अलाणे ग्रामपंचायतीने केला आहे.सरपंच भाग्यलक्ष्मी अभियान आणि सरपंच माहेरीची साडी योजनेतून गावातील महिलांच्या सक्षमीकरणात भर पडावा या चांगल्या हेतूने अलाणे गावाच्या महिला सरपंच अरुणाबाई कोमलसिंग गिरासे यांनी हा उपक्रम राबविला आहे.

व्हिडीओ

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण आपल्या स्तरावर काय करु शकतो ज्यामुळे गावातील मुलींना व महिलांना त्याचा फायदा होईल याचा विचार करत असतांनाच शिंदखेडा तालुक्यातील अलाणे येथील सरपंच अरुणाबाई गिरासे यांनी सरपंच भाग्यलक्ष्मी अभियान आणि सरपंच माहेरची साडी योजनेला अलाणे गावात सुरुवात केली.

यात गावातील मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी या उद्देशाने गावातील सुनबाईने मुलीला जन्म दिल्यास सरपंच भाग्यलक्ष्मी या योजनेतून ग्रामपंचायत अलाणे यांच्याकडून अकराशे रुपये प्रोत्साहनपर रक्कम भेट देण्यात येणार आहे.

तर अलाणे गावातील लाडकी मुलगी लग्न करुन सासरला जातांना ग्रामपंचायत अलाणे कडून माहेरची भेट म्हणून अकराशे रुपयांची पैठणी साठी भेट म्हणून देण्यात येणार आहे. अलाणे ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या चांगल्या उपक्रामासाठी अलाणे ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक आणि गावातील नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.

व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: