अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन 7 वर्षांपासून फरार झालेला संशयित ताब्यात…

बातमी कट्टा:- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन 7 वर्षापासून राजस्थान येथे फरार झालेल्या संशयिताला शिरपूर पोलीसांच्या शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहेत.संशयिता विरुध्द कलम 354(अ),452, 323, 504, 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 11 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल होता.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे सा.पोलीस निरीक्षक गणेश फड शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,गोविंद कोळी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे,मुकेश पावरा व प्रशांत पवार आदींना कारवाईचे आदेश दिले होते.
आदेशानुसार आज दि 6 रोजी यर्हाड कसबे येथून संशयित राकेश उर्फ रावशा दिलीप कोळी वय 27 याला ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुक्यातील तर्हाडकसबे गावात 2015 साली 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर संशयित राकेश ऊर्फ रावशा दिलीप कोळी वय 27 हा राजस्थान येथे फरार झाला होता.7 वर्षांपासून पोलीसांकडून राकेश उर्फ रावशा याचा शोध सुरु होता.दि 6 रोजी सायंकाळी संशयित राकेश हा आपल्या गावी तर्हाडकसबे येथे आल्याची गोपणीय माहिती पोलीसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे संशयित राकेश ऊर्फ रावशा याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: