बातमी कट्टा:- पिंपळनेर येथील घोड्यामाळ परिसरात लग्नाचे आमीष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याची घटना घडली असून यात पिडीतेस दिवस गेले.गर्भपातानंतर पिडीत मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेनंतर फरार झालेल्या संशयिताला पिंपळनेर पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.या घटनेत पिडीतेचा गर्भपात कुठे आणि कोणी केला आला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला होता.
पिंपळनेर पोलिस स्टेशनात मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पिंपळनेर शहरातील वडारवाडी परिसरात पिडीता घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती.तीला खाजगी वाहनाने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भामरे यांनी तपासून मृत घोषित केले. पिडीतेचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात आल्याने तिचा मृतदेह शवइच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे व पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पिडीता गर्भवती असल्याचे समजल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबत पिडीतेचा बळजबरीने गर्भपात करण्यात आल्याने तीचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित राज दिपक शिकलकर याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित राज शिकलकर याने पिडीतेला लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी अत्याचार करत गर्भवती केल्याची फिर्याद दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर संशयित फरार झाल्याने पोलीसांनी तात्काळ संशयिताचा शोध घेत काही तासातच मध्यप्रदेश राज्यातून संशयित राज सिकलकर याला ताब्यात घेतले आहे.पिडीतेचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला असून त्याकारणातून पिडीतेचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून तीचा गर्भपात कुठे व कोणी केला याबाबत पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.


