बातमी कट्टा:- काल दि.19 रोजी धुळे तालुक्यातील कुंडाणे वार शिवारात पांझरा नदीकाठी गट नं ७, क्षेत्र १ हे येथे सायंकाळी ५:३० च्या सुमारास सहायक जिल्हाधिकारी-धुळे यांचे पथकास विनापरवाना चालणारी विट भट्टी व व्यवसायाठिकाणी साठवून ठेवलेला अंदाजे ४००० ब्रास हून अधिक अवैध माती साठा आढळून आला.सदर जागेवर अवैध उत्खनन करून दगड-मुरूम-मातीचे अंदाजे ३००० हून अधिक ब्रासचे जाड थर रचून सपाटीकरण केलेले आढळले.
सदर जागेवरील १ टाटा ट्रक मिनी डंपर, १ जे सी बी मशीन, १ पोकलेन मशीन तसेच उपलब्ध माती साठा जप्त करत ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पंचनामा, जबाब घेण्यात आले आहेत.आज दि २०/११/२०२१ रोजी मोजमाप करनेकामी जलसंम्पदा तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या तांत्रिक प्रतिनिधि यांनी कामकाज केले असुन तसा सविस्तर अहवाल सादर होणार आहे.सहायक जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार धुळे (ग्रा) यांना पुढील दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत.