अशा चोरीच्या घटनेपासून सावधान

बातमी कट्टा:- कपाटाची चावी बनवण्याचा बहण्याने चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कपाटाचे लॉक दुरुस्तीसाठी आलेल्या दोघांनी कपाटातील रोकडसह दागिन्यांची चोरी केली होती. पोलिसांनी 87 हजाराच्या दागिन्यांसह आता एकाला ताब्यात घेतले आहे.

साक्री तालुक्यातील खोरी येथील राहुल भामरे यांच्या घरी दि 4 रोजी 10 वाजेच्या सुमारास कपाटाचे लॉक दुरुस्तीसाठी दोन जण आले होते.काम झाल्यानंतर राहुल भामरे यांना माहित झाले की कपाट ठेवलेले 53 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व 17 रोख रक्कम असा एकुण 69 हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले.राहुल भामरे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला होता.निजामपूर पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेकडून याबाबत समांतर तपास सुरु होता.स्थानिक गुन्हे शाखेचे धुळे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नंदुरबार येथील एकतानगर भागातून सुतारसिंग जलसिंग शिकलीकर याला ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्याचा साथीदार पातालसिंग दिलीपसिंग शिकलीकर याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 87 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

सदर संशयितांनी याच प्रकारे निजामपूर व अमरावती येथून देखील अशा पध्दीने चोरी केल्याची कबूली देण्यात आली आहे.याबाबत संशयित पातालसिंग शिकलीकर याचा शोध सुरु आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,योगेश राऊत,रफीक पठाण, श्रीकांत पाटील,संदीप थोरात,संजय पाटील,गौतम सपकाळे, राहुल सानप,सुनील पाटील,दिपक पाटील आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: