
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील बेटावद गावाजवळ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसच्या बि ८ वातानुकूलित डब्ब्यातून धूर निघत असल्याची घटना आज दि ४ रोजी सकाळच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन कर्मचारी दाखल झाल्याने आग विझवण्यात आली.यावेळी प्रवासी मात्र घाबरले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि ४ रोजी अहमदाबाद हावदा ही एक्स्प्रेस रेल्वे बेटावद जवळ आल्यानंतर त्या रेल्वेच्या वातानुकूलित बोगीच्या खालून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागल्याची घटना घडली.यामुळे प्रवाशांमध्येभिरीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकारानंतर रेल्वे कर्मचारी व अग्नीशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल होत अग्निरोधक सिलिंडरचा वापर करीत आग वाजवण्यात आली. हा धूर हॉट एक्सलमुळे येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही वेळानंतर पुढील प्रवासासाठी गाडी मार्गस्थ झाली.
