आईसोबत थांबला चिमुकलीचा श्वास !

बातमी कट्टा:- आई व तिच्या 9 महिन्यांची चिमुकलीचा घरातच मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रथमदर्शनी चिमुकलीच्या पोटाला दोरच्या साह्याने फास लावल्याचे दिसून आले तर आईने दोरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील वणी बु. येथील सुधाकर माळी यांचे दिड ते पवणेदोन वर्षांपूर्वी सोनल माळींसोबत विवाह झाला होता.सुधाकर माळी हे आपल्या आई वडीलांशी काही दिवसांपासून विभक्त होऊन पत्नी सोनल माळी आणि आणि नऊ महिन्याच्या चिमुकलीसोबत गावातीलच घरात राहत होते. शुधाकर माळी शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात.

शनिवारी दुपारच्या सुमारास सुधाकर माळी बाहेर गेले असल्याने पत्नी सोनल माळी आणि मुलगी घरात एकट्या होत्या.सुधाकर माळी घरी परतले तेव्हा पत्नी सोनल माळी यांचा झोळीचा दोर घरातील लोखंडी कडील बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सोनल यांचा मृतदेह आढळून आला तर पोटाला दोर बांधून फास लावलेल्या स्थितीत मुलीचा मृतदेह आढळून आला.सुधाकर माळी यांन आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली.दोघांनाही धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी करुन दोघांनाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती सर्वत्र पसरताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीसांच्या उपस्थितीत मृत सोनल आणि मुलीची रविवारी सकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

WhatsApp
Follow by Email
error: