बातमी कट्टा:- मोटरसायकलीने आईंना घेऊन जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महिलेचा जागिच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर आणि पनाखेड गावादरम्यान अपघात झाल्याची घटना घडली.मध्यप्रदेश राज्यातील वरला तालुक्यातील सोलवण येथील नानसिंग धुरसिंग पावरा वय 35 हे मोटारसायकलीने त्यांच्या आई रंगीबाई धुरसिंग पावरा वय 60 यांना घेऊन सांगवीकडे येत असतांना आज दि 18 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला मागून धडक जोरदार दिली.या अपघातात रंगीबाई धुरसिंग पावरा वय 60 यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मोटरसायकल चालक नानसिंग धुरसिंग पावरा वय 35 हे जखमी आहेत.त्यांना तात्काळ उपस्थितांनी महामार्ग रुग्णवाहीकाने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.डॉ अमोल जैन यांनी रंगीबाई पावरा यांना तपासून मृत घोषित केले आहे.