आगीत गुरांचा गोठा जळून खाक

बातमी कट्टा:- मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.वेळीच मदतकार्य केल्याने बैल जोडी व म्हैशींचे प्राण वाचले असून आगीत चारासह बैलगाडी जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 17 रोजी मध्यरात्री 1:30 ते 2 च्या दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील सुधाकर कथ्थु बच्छाव यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली.रात्रीच्या सुमारास दोंडाईचा कडून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर मधील शेतकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी गोठ्याजवळ धाव घेतली.त्यांनी तात्काळ गोठ्याच्या बाहेर बांधून ठेलेले बैलांची जोडी व म्हशी सोडून आगीपासून बचाव केला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विरदेल येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.शिंदखेडा व दोंडाईचा येथील दोन अग्निशमन घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र त्यावेळी संपूर्ण गोठ्यातील चारा व बैलगाडी जळून खाक झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: