बातमी कट्टा:- अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली असून यात संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून झाले आहे.अत्यंत हलाखीची परिस्थिती असतांना जेमतेम उभ केलेले संपूर्ण घर जळून खाक झाल्याने कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील न्यु प्लॉट परिसरात कालिदास पावरा हा आपल्या पत्नी ,लहान मुले आणि वडीलांसोबत वास्तव्यास होता.मिळेल तिथे मोलमजुरी करून कालिदास घराचा उदरनिर्वाह करत होता.मात्र आज दि 12 रोजी सकाळच्या सुमारास घरातील सर्व सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेले असतांना कालिदास पावरा यांच्या घराला अचानक आग लागली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.या आगीत कालिदास पावरा यांए संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.या आगीत धान्य कपडे देखील राख झाली.
या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. जेमतेम कुडाचे उभे केलेले घर डोळ्यासमोर आगीत जळून खाक झाल्याने कालिदास पावरा यांच्या कुटूंबीयांनी आक्रोश व्यक्त केला होता.