बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील लोणखेडी गावात झोपडीला आग लागल्याने चिमुकल्या भाऊ बहिणीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेणू आणि अमोल या दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी फेसबुक लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/share/v/SecazNPvQWr6Tg64/?mibextid=qi2Omg
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील दिंगरी नाना पवार हे पत्नीसोबत उस तोडीसाठी बारामती गेल्याने त्यांनी त्यांची चार वर्षांची मुलगी रेणू व ७ वर्षाचा मुलगा अमोल यांना धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे आजीकडे पाठवले होते.अमोल हा लोणखेडी गावात पहिलीचे शिक्षण घेत होता.तर रेणू अंगणवाडीत जात होती.

व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी फेसबुक लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/share/v/SecazNPvQWr6Tg64/?mibextid=qi2Omg
लोणखेडी गावापासून एक किमी अंतरावर टेकडीवर आजी झोपडीत आपल्या नात नातू सोबत राहत होती.मोलमजुरी करून आजी घराचा उदरनिर्वाह करत होती.दि १७ रोजी दुपारी आजी नेहमीप्रमाणे गुरांना पाणी पाजण्यासाठी बाहेर गेले यादरम्यान रेणू आणि अमोल दोन्ही चिमुकले झोपडीत असतांंना झोपडीला आग लागली.काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि या आगीत रेणू आणि अमोलचा होरपळून मृत्यू झाला.
व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी फेसबुक लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/share/v/SecazNPvQWr6Tg64/?mibextid=qi2Omg
लोणखेडी गावापासून एक किमी दुर टेकडीवर झोपडी असल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत सर्व काही राखरांगोळी झाली होती.अमोल आणि रेणू या दोन्ही चिमुकल्यांचा अक्षरशः कोळसा झाला होता.घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर मृतदेह बाहेर काढत धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई आणि वडील रात्रीतून लोणखेडी येथे पोहचले घटना ऐकून त्यांनी हंबरडा फोडला.आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कारण समजू शकलेले नाही.
व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी फेसबुक लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/share/v/SecazNPvQWr6Tg64/?mibextid=qi2Omg