
बातमी कट्टा:- मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दोन मजली दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.या आगीच्या भडक्यात दोन जण जखमी झाले आहेत.आगीमुळे २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार दोंडाईचा येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील श्रद्धा एजन्सी ही होलसेल विक्रेता दुकान आहे. त्यास रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती दुकान मालक गणेश पवार यांना मिळाली. दुकान मालक गणेश पवार आपल्या नातेवाईक समाधान ठाकरे यांना घेऊन दुकानावर गेले असता दुकानात मोठी आग लागण्याचे दिसून आले त्यावेळेस त्यांनी धावपळ करत गणेश पवार व समाधान ठाकरे यांनी संपूर्ण ताकतीने शटर ओपन केले असता दुकानातील आगीचा भडका दुकान मालक गणेश पवार व समाधान ठाकरे यांच्यावर आला यात दोघांना गंभीर दुखापत झाली त्यांना धुळे येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर दुकानात बिडी सिगारेट पान मसाला असे होलसेल माल होता, घटनास्थळी दोंडाईचा येथील अग्नी शामक बंबच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र त्या वेळेपर्यंत दुकानातील साहित्यांसह संपूर्ण फर्निचर असा सर्व सामान जळून खाक झाला आहे.यात दुकानाच्या वरील धाब्याचे लाकूड जळाल्यामुळे दोन मजली सर्व दुकान खाली कोसळले.सदर घटनेत २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.