बातमी कट्टा:- अचानक शॉर्टशर्कीट झाल्यामुळे आगीत हॉटेल जळून खाक झाल्याची घटना घडली असून या आगीत सुमारे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले.हॉटेलमधील काऊंटर टेबल, सीसीटीव्ही कँमेरा,कांऊटर मधील 25 हजाराची रोकड,दोन डि-फ्रि,कॉम्प्युटर,टिव्ही,सहा फँन,पाण्याची टाकी आदी वस्तू जळाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत गरताड रस्त्यावर असणाऱ्या सनी गार्डन हॉटेलला आज दि 10 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शॉर्टशर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे.दुपारी हॉटेल बंद असल्याने हॉटेलात कोणीही कर्मचारी हजर नव्हते. दुपारी 4 वाजेनंतर सर्व कर्मचारी हॉटेलमध्ये येत असतात. दुपारी तीन वाजेच्या सुमारास हॉटेलच्यावरच्या बाजूने धुर येत असल्याचे ये – जा करणाऱ्यांना दिसल्याने त्यांनी तात्काळ हॉटेलचे मालक विकास दगा माळी यांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी मालक विकास माळींसह नागरिकांनी धाव घेतली असता हॉटेल मधून आगीचा ज्वाला येत होत्या. यावेळी तात्काळ नागरिकांनी मदतकार्य सुरु करत अग्निशमन बंब बोलवून आग आटोक्यात आणली मात्र त्यावेळेत आगीत हॉटेल मधील काऊंटर टेबल,सीसीटीव्ही कँमेरा,कांऊटर मधील 25 हजाराची रोकड,दोन डि-फ्रि,कॉम्प्युटर,टिव्ही,सहा फँन,पाण्याची टाकी आदी जळून अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
हॉटेल काऊंटरच्या वर असलेल्या इलेक्ट्रीक बोर्डमध्ये शॉर्टशर्कीट झाल्याने काऊंटर वरील कॉम्प्युटर, ठेबल,रोक रक्कमसह ईतर साहित्यांना सुरवातीला आग लागली व त्यानंतर संपूण हॉटेलमध्ये आग पसरली.यात संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले आहे.घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे मनोज कुवरसह पोलीस पथक दाखल झाले होते.