आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुमारे 50 एकर ऊस जळून खाक…

बातमी कट्टा:- डीपीवरील शॉर्टशर्कीटमुळे अचानक लागलेल्या आगीत सुमारे 50 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी दि 7 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 7 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील टेंभा त.सा (सारंगखेडा नजीक) दुपारी एक वाजेच्या सुमारास चेतन विनोद पाटील यांच्या शेतातील डीपीलगत असलेल्या 9 ते 10 एकरातील ऊसाला शॉर्टशर्कीटमुळे आग आगली होती. दुपारी कडक उन्हासह वारा देखील सुरु होता यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले जवळपास असलेल्या ईतर शेतातील ऊसाला देखील आग लागली या आगीने अंदादे सुमारे 50 एकर ऊस जळून खाक झाला.यात चेतन पाटील, जखतसिंग गिरासे, मनीषा जगतसिंग गिरासे,पुरुषोत्तम पाटील , छोटुलाल पाटील, दौलतसिंग राजपूत, शिवदास पाटील,रमेश पाटील, विलास पाटील, वसंत पाटील, अशोक पाटील, राजेंद्र पाटील यांच्या सह ईतर शेतकऱ्यांचा ऊस ऊस जळून खाक झाला आहे.

घटनेची माहिती मिळाताच घटनास्थळी समशेरपूर ,सातपुडा येथील साखर कारखान्याच्या अधिकारींनी भेट दिली.साखर कारखान्याचे ऊसतोड यंत्राद्वारे शेतातील ऊस तोडणी करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: