बातमी कट्टा :- देशाचे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरांचा दुर्दैवी मृत्यू होतांना दिसत आहेत. ऐवढी मोठी घटना होत असतांना मात्र या घटनेला कोणीही वाली नसल्याचे बघायला मिळत आहे.एकाच वेळेस पहिले 12 मोरांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते.त्यानंतर आणखी तीन दिवसात 7 मोरांना आपला जिव गमवावा लागला आहे.राष्ट्रीय पक्षाची अशी अवस्था होत असणार तर यापेक्षा आणखी मोठी शोकांतिका काय राहु शकते ? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे चार दिवसापूर्वी 12 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.एकाच वेळेस 12 मोरांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना होती. विषारीयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक आंदाज व्यक्त करण्यात येत होता.हे 12 मोर वगळता एक मोराची प्रकृती चिंताजनक होती त्या मोराचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.

तापी नदीचा परिसर असल्याने व जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या भागात मोर दिसून येतात. या परिसरात मोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो मात्र अचानक एकाच वेळेस 12 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिक व प्राणीमित्रांनी रोष व्यक्त केला होता. यात आणखी 2 ते 3 दिवसात मोरांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांकडुन संताप व्यक्त होत आहे.
देशाचे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या 12 मोरांचा मृत्यू नंतर संबधीत अधिकारींनी सावध होणे गरजेचे होते.मात्र त्याघटनेनंतर देखील मोरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.एकुण 19 मोर दगावले असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.