बातमी कट्टा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व मॉल्स, दुकाने, शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी, ग्राहकांची प्रवेशद्वारावरच पडताळणी करण्यात येणार आहे. ‘कोविड- 19’ लसीकरणाची किमान एक मात्रा घेतलेली नसल्यास अशा ग्राहकांना, अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत No Vaccine No Entry हा नियम काटेकोरपणे पाळावा, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
जिल्हादंडाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे, ‘कोविड-19’ विषाणूच्यार संसर्गाचा प्रादुर्भाव असल्या1च्या पार्श्वाभूमीवर मुख्य सचिवांनी याबाबत दूरचित्रवाणीद्वारे (VC) सूचना दिल्या आहेत. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या- टप्प्याने कमी केलेले असून कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, राज्यातील Covid-19 लसीकरणाचे प्रमाण 74 टक्के आहे. धुळे जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 60 टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल, किराणा मालाची मोठी दुकाने, बहु-मजली दुकाने (Multi Store Shops), शासकीय /निमशासकीय, अनुदानित, विना अनुदानित कार्यालयीन आस्थापना, उद्योग व परिसर, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकाने (Multi Product Selling Shops), तत्सम सर्व दुकाने, आस्थापनांमध्ये कार्यरत दुकान मालक, विक्री अधिकारी /विक्री कर्मचारी/ सहायक कामगार वर्ग, कार्यरत सर्व मनुष्यबळाने कोविड-19 प्रतिबंधात्मवक लसीकरणाच्यान दोन मात्रा पूर्ण झाल्याSची खातरजमा स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. कोविड प्रतिबंधात्मंक लसीकरण पूर्ण झाल्यानचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्तत करुन घ्यालवे.
ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्याकस नजीकच्या् लसीकरण केंद्रात जावे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे,. जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगारांचे लसीकरण पूर्ण होईल याची खात्री करावी.
सर्व अस्थापना व तत्सम सर्व दुकाने जेथे ग्राहकांची / अभ्यागतांची वर्दळ असते अशा सर्व ठिकाणी लसीकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण केलेली असणे आवश्यक व लसीकरणाची एकही मात्रा झालेली नसल्यास असे ग्राहक, अभ्यागताना शासकीय/ निमशासकीय कार्यालयात, दुकानांमध्ये खरेदीकरीता प्रवेश देवू नये. ग्राहक, अभ्यागतांचे आधारकार्ड / मोबाईल क्रमांकावरुन लसीकरण झाल्याकची पडताळणी करावी. असे नसल्यास असा ग्राहक, अभ्यागताने किमान 15 दिवसांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह (Negative) अहवाल दाखविल्यास या आस्थापनांमध्ये प्रवेश द्यावा.
सर्व शॉपिंग मॉल, किराणा मालाची मोठी दुकाने, बहुमजली दुकाने (Multi Store Shops), कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकाने (Multi Product Selling Shops), इत्यादी, तत्सम सर्व दुकाने, आस्थापनांच्या ठिकाणी ग्राहकांची संख्या अधिक असते. अशा ठिकणी लसीकरणाची उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिने त्या-त्या आस्थापना व व्यवस्थापनांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने विशेष मोहीम राबवून अधिकाधिक ग्राहकांचे लसीकरण करीत सामाजिक जबाबदरी म्हणून सहभाग नोंदवावा.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत नोंदणीकृत सर्व आस्थापनांच्या ठिकाणी कामगार उपायुक्त, जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयामार्फत तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण झालेल्या असल्याची खात्री करावी. याशिवाय नियमितपणे मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखणे, सॅनेटायझरचा वापर, आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फ़ौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. तसेच Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करना-यांवर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल., असेही जिल्हादंडाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे.