आदर्श शिक्षक व राष्ट्र, आरोग्य, सामाजिक सेवेचा सन्मान!ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांचे विविध पुरस्कार जाहीर

बातमी कट्टा:- गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग १४ वर्षांपासून अविरतपणे विविध उपक्रमातून तालुक्याचे नाव लौकिक करणारी  ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी या सेवाभावी संस्थेकडून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकांना व समाजाप्रती दातृत्वातुन सेवा देणार्‍या व्यक्तींचा ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी (आय एम आर डी महाविद्यालय येथील एस एम पटेल हॉल) येथे सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ‘ज्ञानदिप आदर्श शिक्षक पुरस्कार” व सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील कुरखळी स्व. दीपक मोरे (शिक्षक) व स्व. निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २०२५-२६ या वर्षाचे पुरस्कार पुढील प्रमाणे
पहिल्या गटातला आदर्श शिक्षक पुरस्कार –
१) श्रीमती. मेघा शशिकांत हिंगोणेकर – आदर्श शिक्षिका- जि. प. शाळा, भूपेशनगर ता. शिरपूर
२) श्रीमती स्वाती अनिल जगदाळे – आदर्श शिक्षिका- आर सी पटेल मराठी प्राथमिक विद्यालय, वाल्मिक नगर, शिरपूर
३) दीपक विनायक पाटील- युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक – जि प मराठी प्राथमिक शाळा, मांजरोद शिरपूर,
४) श्रीमती. नंदा रतन पाटील- आदर्श मुख्याध्यापक – जि प प्राथमिक शाळा लौकी ता. शिरपूर
५) श्री रविंद्र रामदास सोनगीरे- आदर्श शिक्षक – आर सी पटेल इंग्रजी माध्य. विद्यालय, ता. शिरपूर
६) श्री अनूप चंदेल – आदर्श क्रीडा शिक्षक – आर सी पटेल इंग्रजी माध्य. विद्यालय, शिरपूर
७) श्री. सुधाकर भरत वळवी- आदर्श कला शिक्षक – आर सी पटेल माध्य. विद्यालय, टेकवाडे ता. शिरपूर

दुसर्‍या गटातला सेवा पुरस्कार –
१) पोलीस शिपाई स्व. शहीद राहुल गोपीचंद पावरा-(राष्ट्र सेवा पुरस्कार) – यांचे आई वडील
२) श्री. विश्वास सुभाष पाटील- ( आरोग्य सेवा पुरस्कार) समुदाय आरोग्य अधिकारी- आरोग्य उपकेंद्र, कुवे
३) श्री कृष्णा रामचंद्र भावले-(सामाजिक सेवा पुरस्कार) – नशामुक्ती अभियान, सातपुडा परिसर
४) योग विद्या धाम (योग सेवा) शिरपूर सदर पुरस्कारांची निवड करण्यासाठी संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्यी निवड समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीकडे महाराष्ट्रातून एकूण २१ प्रस्ताव विविध क्षेत्रातून प्राप्त झाले होते. त्यातून वरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: