
बातमी कट्टा:- मुंबई येथे कोळी समाज बांधवांकडून रेल्वे स्थानकावर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना घेराव घालण्यात आला.यावेळी विजयकुमार गावीत यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आल्याचा व्हिडीओ सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
कोळी समाजबांधवांकडून न्याय हक्कासाठी मुंबई येथे मंत्रालयावर संघर्ष पदयात्रा मोर्चा काढण्यात आला आहे.दि 17 नोव्हेंबर पासून या पायी मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा ठाणे येथे आल्यानंतर मुलूंड चेकनाक्याजवळ आडविण्यात आला यामुळे कोळी समाज बांधव संतप्त झाले आहेत.
यातच मुंबई येथील सेंट्रल रेल्वे स्टेशनवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर व तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी आदीवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना घेराव घालत संताप व्यक्त केला.यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांच्यासह सरकारच्या विरुध्द घोषणाबाजी करण्यात आली.