आदीवासी भागाचा दौरा दरम्यान समस्या लक्षात आली…आणि जि.प.अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या प्रयत्नांनी 10 रुग्णावाहीका खरेदीला मंजूरी मिळाली…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील आदिवासी व पेसा क्षेत्रातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पेशंत ट्रान्सपोर्ट टाईप बीएसी रुग्णावाहीका खरेदीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी दिली आहे.

13 व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याज्याच्या रकमेतून धुळे जिल्ह्यातील आदिवासी व पेसा क्षेत्रातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 1 मार्च 2012 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रुग्णवाहिका खरेदीस मंजूर देण्यात आलेली होती.डॉ तुषार रंधे यांनी साक्री व शिरपूर या अतिबहुल आदीवासी भागाचा दौरा करीत असतांना प्रामुख्याने आदिवासी भागात रूग्णांना दवाखान्यात ने- आण करण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे 10 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रूग्णावाहीका खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.शिरपूर व साक्री तालुक्यातील कुडाशी, नवापाडा, बोराडी,रोहीणी, वाडी वकवाड,रोहोड,शिरसोला,सुकापूर,टेंभा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळणार आहे.

यासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,खासदार डॉ सुभाष भामरे,आमदार जयकुमार रावल,जि.प.उपाध्यक्ष कुसुम निकम,आरोग्य सभापती मंगला पाटील, मोगरा पाडवी,सीईओ वान्मथी सी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले,आदींचे सहकार्य लाभले यावेळी सांगितले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: