आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप आहे का ? नसणार तर आजच डाऊनलोड करा, वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी ॲपमध्ये समजते स्थिती…

बातमी कट्टा: मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेले “दामिनी” ॲप वापरण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने दिल्या आहेत.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना ॲपचा वापर करावा.

“दामिनी” ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: