आप जो है के मानते नही…पर “ये पब्लिक हे सब जानती है !”

बातमी कट्टा (अवतार) :-लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने शिरपूर तालुक्याला निधींचा पाऊस पाडत विकास कामांच्या उदघाटन आणि भूमिपूजनांचा धडाका बघायला मिळत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी याच शिरपूर तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर देखील पोहचणे शक्य झाले नाही.त्यामुळे “ये पब्लिक हे सब जानती है ! हे लक्षात असू देणे नेतेमंडळींना गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊसामुळे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.या पावसाने प्रचंड नुकसान झाले.मात्र शेतकऱ्यांचे अश्रु पुसायला कोणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले नाही. आता लोकसभा निवडणुक जवळ येत आहे. शिरपूर तालुक्याला प्रचंड निधी वाटप करण्यात येत आहे. विकास कामांच्या उदघाटनांचा आणि भुमिपुजनांचा झंजावत बघायला मिळत आहे.या विकास कामांच्या निधींमुळे तालुक्यातील विकास होणार हे नक्की आहे.शिरपूर तालुक्यावर आपले प्रचंड प्रेम असल्याचे निवडणूकीच्या तोंडावर काळजी दिसत आहे.मात्र ज्या पध्दतीने तालुक्यात दौरे काढून विकास कामांच्या उदघाटनांसाठी खर्च करण्यात येतो त्या पध्दतीने शेतकऱ्यांसाठी देखील दौरे काढायला हवे होते.या मायबाप शेतकऱ्यांना कोण वाली राहणार ? राजकीय मंडळी जर यापध्दतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असतील तर शिरपूर तालुक्यातील शेतकरी कोणाकडे जातील.निवडणूक लढवल्यानंतर ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले त्या शेतकऱ्यांकडे तुम्ही पाच ते सहा वर्षात ढुंकूनही बघितली नाही तर पुढे निवडणूका येत आहेत. मतदान देखील होणार आहे. मात्र यावेळेस शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मतदानातून वेगळेच चित्र बघायला मिळेल हे देखील तेवढेच खर आहे. कारण “ये पब्लिक है सब जानती है ! हे लक्षात असू द्यावे.

याबाबत आपले मत 8975850892 या वॉटसअप क्रमांकावर मांडू शकतात

WhatsApp
Follow by Email
error: