
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर येथील वीज कंपनी कार्यालयावर भाजपा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात येणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी केले आहे.

शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धोरणाला कंटाळली आहे. शेतकऱ्यांविरुद्ध असलेल्या वीज कंपनीच्या धोरणाबाबत जाब विचारण्यात येणार आहे. शिरपूर तालुक्यात वीज पुरवठा अनियमित होत असून लोडशेडिंगचे वाढते प्रमाण, अनेक ठिकाणी फक्त तीन तास वीज मिळते, अनावश्यकपणे विद्युत पुरवठा खंडित केला जातो, कमी दाबाने वीज पुरवठा होतो, नियमितपणे कधीच वीज पुरवठा सुरळीत राहत नाही, बागायती पिकांना फक्त तीन तासच वीज पुरवठा होणे, यामुळे पिकांना जीवदान कसे मिळणार. शेतकरी बांधव वीज कंपनीच्या धोरणाला पूर्णपणे कंटाळले असून वीज पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली करवंद रोड वरील आमदार कार्यालयापासून शिरपूर येथील वीज कंपनी कार्यालयावर भाजपा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
सर्वांनी करवंद रोड येथील आमदार कार्यालयात 10.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी केले आहे.
