आमदार अमरिशभाई पटेल आपण आणत असलेल्या निधीच्या कामाची एकवेळा चौकशी करा,बाळदे वाघाडी रस्त्यावर सुरु असलेल्या कामावर प्रश्न चिन्ह ?

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार अमरिशभाई पटेल निधी आणत असले तरी त्यांच्या निधीचा कशा प्रकारे गैरवापर करण्यात येतो याचे जिवंत उदाहरण बघायचे झाले तर सध्या सुरु असलेल्या बाळदे जातोडे परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे.

शिरपूर तालुक्यातील बाळदे – वघाडी रस्त्यावर अत्यंत थातुरमातुर पध्दतीने रस्त्याचे काम सुरु आहे.विशेष म्हणजे याकडे संबधीत अधिकारी देखील कानाडोळा करतांना दिसत आहे.काही दिवसांपूर्वी करणात आलेल्या कामाची पुन्हा पोलखोल होतांना दिसत आहे.शिरपूर तालुक्यासह परिसराचा विकास व्हावा या चांगल्या हेतूने निधी खेचून आणत असतांना त्या निधीचा अशा पध्दतीने दुरउपयोग होत असल्याने परिसरातील जनतेचा विश्वास उठतांना दिसत आहे.

विशेष म्हणजे याकमाकडे संबधीत विभागाचे अधिकारी का लक्ष देत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर अधिकारी काम करत असतील तर त्यावर अद्याप कुठलीच कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित होतांना दिसत आहे.अशा भ्रष्ट कामाची तात्काळ चौकशीकरून कारवाई करण्यात यावी अशी ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: