आमदार कुणाल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभा तालिका, अध्यक्षपदी निवड,पहिल्याच दिवशी चालविले कामकाज….

बातमी कट्टा:- आज सुरु झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिका अध्यक्षांवर असते. प्रत्येक पक्षाकडून विधानसभेतील अभ्यासू आमदारांची त्यासाठी निवड केली जाते.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षातर्फे तालिका अध्यक्षांकडे केली होती. त्यानुसार अध्यक्षांनी तालिका अध्यक्ष म्हणून आ.पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

प्रत्येक अधिवेशनात तालिका अध्यक्षपदावर विविध आमदारांची अनुभव आणि ज्येष्ठता पाहून त्या पक्षाचे विधिमंडळ नेते शिफारस करत असतात, त्यानुसार ही निवड होत असते. आज सुरु झालेले हिवाळी अधिवेशन दि.22 ते 28 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आ.कुणाल पाटील यांनी तालिका अध्यक्षपदी बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून आलेले आ.कुणाल पाटील यांना आज पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून कामकाज चालविण्याची संधी मिळाली. प्रश्‍नोत्तराच्या कामकाजात ऊर्जा विभागाच्या प्रश्‍नावर आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांच्या निवडणुकीतील जाहिरनामे सभागृहात दाखवून मोफत विजेचे आश्‍वासन दिले असल्याचे सांगितले, त्यावर ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी आपल्या उत्तरात देशातील इतर नेत्यांनी कशी आश्‍वासने दिले असल्याचे सांगितले.त्यावर देशातील इतर नेत्यांनी कशी आश्‍वासने दिली हे सांगताच सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ सुरु केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे जाहिर केले आणि भाजपा आमदारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, त्यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान आ.कुणाल पाटील यांनी अत्यंत संयमाने कामकाज हाताळले. आणि राज्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विजेच्या प्रश्‍नावर ऊर्जा मंत्र्यांचे उत्तर महत्वाचे आहे, ते उत्तर होऊ द्या असे सांगून कामकाज हाताळले. त्यानंतर काही वेळ कामकाज स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरु झाले. तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून आ.कुणाल पाटील यांनी कामकाज यशस्वीपणे सांभाळले. एप्रिल 2021 मध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. आता 2021 मध्येच त्यांनी विधानसभेचे तालिका अध्यक्षपदावर आपली जागा बनवली आहे. त्यांच्या या कामगिरीचे खान्देशात विशेष कौतुक होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: