बातमी कट्टा:- केसर युक्त पान मसाला व तंबाखू आयशर वाहनातून वाहतूक करतांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून यात 48 गोण्यांसह 38 लाख 3 हजार 840 किंमतीचा मुद्देमाल वाहनाला देखील ताब्यात घेत कारवाई केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 26 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सोनगीर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपणीय आधारे पोलीस पथक महामार्गावर सापळा रचुन थांबले असता दोंडाईचा कडून धुळ्याकडे जाणारे एम एच 15 एफव्ही 8855 या आयशर वाहनाला सरवड फाट्या जवळ थांबवले असता त्यात केमीकल ड्रम व प्लास्टिकचे युज अँण्ड थ्रु प्लास्टिक ग्लासचे बॉक्स मिळुन आले.यावेळी पोलीसांनी तपासणी केली असता त्यात 28 लाख 3 हजार 840 रुपये किंमतीचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखूच्या 48 गोण्या मिळुन आले आहेत.एकुण 38 लाख 3 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल पोलीस वाहनासह केसरयुक्त पान मसाला व तंबाखू जप्त करत कारवाई करण्यात आली आहे.यात मुस्तकिम शेख राजु वय 33 धुळे व जुल्फेकार शेख नुर मोहम्मद वय 34 रा.नेर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील,शामराव अहिरे,अजय सोनवणे,सदेसिंग चव्हाण,सनजय जाधव, शिरीष भदाणे व अतुल निकम आदींनी केली आहे.याबाबत सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करीत आहेत.