बातमी कट्टा:- ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या आयशरचा आणि भरधाव ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाल्याची घटना आज दि 29 रोजी सायंकाळी घडली आहे.या घटनेत चार जण ठार असून दोन गंभीर तर 17 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 29 रोजी सायंकाळी शहादा शहराबाहेरील खेतीया लोणखेडा बायपास रस्त्यावर नवीन बस स्टँड जवळ भरधाव ट्रॅव्हल आणि आयशरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ऊसतोडीसाठी सांगलीकडे मजूर घेऊन जाणाऱ्या आयशरचा आणि खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.या अपघातात शहादा तालुक्यातील पाडळदा येथील प्रमिला किशोर भिल वय 28, सुनीता अशोक पाडवी वय 45, करन अशोक पाडवी वय 26 व अलखेड येथील रमनबाई आकिराम भील वय 50 या चार जणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर असून 17 जण जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह प्रशासनाने धाव घेत मदतकार्य सुरु केले होते.