
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील आरोग्य दूत आणि डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्विय्य साहाय्यक दिनेश अशोक पाटील (श्याम पाटील ) यांचे आज दि 16 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील आरोग्यदूत आणि डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्विय्य साहाय्यक दिनेश आशोक पाटील ऊर्फ शाम पाटील यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.छातीत दुखू लागल्याने श्याम पाटील यांना शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांना मृत अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांसह मित्र मंडळींनी गर्दी केली.उद्या दि 17रोजी सकाळी 10 वाजता अर्थे बु.येथे राहत्या घरापासून शाम पाटील यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.शाम पाटील यांच्या पश्चात चार वर्षाचा मुलगा,पत्नी,आई,दोन भाऊ असा परिवार होत.