बातमी कट्टा:- शिरपूर येथील आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीमध्ये ‘कन्व्हर्जेस २०२५‘ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे २७ व २८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी इंदोर येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या, जापनीज डेव्हेलप्मेंट सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर मनीष मेहरा, एन २ स्तरावरील वरिष्ठ द्विभाषिक तज्ञ अभिषेक मौर्य तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार असल्याचे परिषदेचे समन्वयक व महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्याना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकसित होणाऱ्या नवनवीन प्रवाहांची ओळख व्हावी, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा समर्थपणे सामना करण्याची क्षमता त्यांच्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना नवकल्पना व संशोधनं मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे दरवर्षी ‘कन्व्हर्जेस’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे उत्कृष्ठ पद्धतीने आयोजन करते. या वर्षी देखील महाविद्यालयाच्या आयोजन समितीद्वारे ‘कन्व्हर्जेस २०२५‘ या होऊ घातलेल्या कार्यक्रमाचे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चोख नियोजन केले आहे. याचबरोबर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते ‘फॉरेन लँग्वेज सेल’ आणि ‘फॉरेन लँग्वेज लायब्ररीचे’ अनावरण होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी प्राप्त व्हावी यासाठी परकीय भाषेचे ज्ञान आणि कौशल्य आत्मसाद असणे हि काळाची गरज बनली आहे. हि बाब ओळखून महाविद्यालयातर्फे फार आधीपासूनच शेकडो वियार्थ्यांना जर्मन आणि जापानी भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे.
आर.सी.पटेल स्वायत्त अभियांत्रिकीद्वारे तंत्रज्ञातील निरनिराळ्या क्षेत्रातील आवड आणि रुची असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना कन्व्हर्जेस २०२५ या कार्यक्रमात सामील करून तंत्रज्ञाचा उत्सव घडवून आणण्याचा मानस ठेवला आहे. तंत्र परिषदेच्या जाहिरात आणि प्रसिद्धी समितीत असणारे विद्यार्थी-स्वयंसेवक परिसरातीलच नव्हे तर राज्यातील अनेक भागातील महाविद्यालयांत पोहचून या तंत्र परिषदेची माहिती व आमंत्रण तेथील विद्यार्थ्यांना सादरीकरण, भित्तीपत्रक, निमंत्रण पत्रिका आणि इतर माध्यमांद्वारे देत आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://converges.rcpit.ac.in/ ही लिंक देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊन आपले तंत्रज्ञाचे कौशल्य प्रदर्शित करतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासह तंत्रज्ञानातील नाविन्यता व परस्परांतील समन्वयावर भर देत या स्पर्धेच्या जगात कसे टिकावे हे अनुभवण्याची संधी याद्वारे प्राप्त होणार आहे. यात एरो ग्लाइडिंग आणि म्युगल मिस्ट्रीचे, ब्रेन चार्जचे आणि सेरेब्रल ॲनिमेव्हर्स, इलेक्ट्रो टॉय आणि मॉडेल मेकिंग, द लास्ट प्लेयर, वॉटर रॉकेट चॅलेंज, ट्रेड टेक, बोट फ्लोट, गुगलर, स्क्विड मेझ, ब्रिडगोमॅनिया, कोडक्रेझ आणि रोबो फिफा या मुख्य स्पर्धा आणि खेळांचे आयोजन सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि सहयोगी शिक्षणासाठी सर्वसमावेशक मानवी मूल्य आणि नैतिकता यांच्या विकासासाठी असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या स्पर्धामधील विजेत्यांना एकूण २ लाख रुपयांची पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून विविध अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती या परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.सुहास शुक्ल व रजिस्ट्रार डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली आहे.
डॉ. जे. बी. पाटील, संचालक : विद्यार्थ्यांनी त्यांना रुची आणि आकर्षण असणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग व्यावहारिक आणि सामाजिक जीवनात करीत असतांना सर्जनशीलता, नाविन्यता, कल्पकता, सौंदर्य आणि नैतिकता हा भाव जोपासत देश आणि समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा तसेच परस्पर सहकार्यातून नोरोगी स्पर्धा करीत उत्कृष्टता आणि प्राविण्य प्राप्त करावे यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी ‘कन्व्हर्जेस’ या तंत्र परिषदेचे आयोजन करीत असतो. हजोरो च्या संख्येने विद्यार्थी सहभागी होऊन लाखो रुपयांची बक्षिसे देखील प्राप्त करीत असतात. या वर्षी देखील २७ ते २८ फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या या तंत्र उत्सवात राज्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे याद्वारे आवाहन परिषदेच्या आयोजन समिती तर्फे करतो.