आ.अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वि.का. सोसायटीची निवडणूक बिनविरोध

बातमी कट्टा:- माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण व मोहन हुलेसिंग पाटील यांनी या निवडणुकीची जबाबदारी पार पाडली.सर्व बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला आमदार कार्यालयात शुक्रवारी 13 मे रोजी सायंकाळी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिगंबर माळी, नवनिर्वाचित सर्व संचालक, सोसायटी सचिव सुनिल कलाल, चंद्रभान माळी उपस्थित होते.

 सन 2022 ते 2027 या पाच वर्षांसाठी शिरपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी म्हणून बिनविरोध संचालक पदी मोहन हुलेसिंग पाटील, उत्तमराव हिरामण माळी, सतिष काळू पाटील, संतोष महारु माळी, सोनू शिकारी सोनार, सुनील अमृतलाल माहेश्वरी, महेश भिलेसिंग राजपूत, प्रकाश महारु चौधरी हे आठ संचालक तसेच इतर मागास वर्ग ओबीसी जागेसाठी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव तुकाराम चव्हाण, महिला प्रतिनिधी पदी सविता पद्माकर देशमुख व सुनंदाबाई संतोष चौधरी, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग जागेवर गणपत खुशाल धनगर, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून चावदस मोतीराम चांभार असे एकूण तेरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक बागल यांनी काम पाहिले.सर्व बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: