आ.अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. च्या विविध महाविद्यालयात ८४५ दात्यांचे रक्तदान

बातमी कट्टा:- शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल व एस. व्ही. के. एम. च्या विविध महाविद्यालयात ८४५ दात्यांनी रक्तदान केले.

आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण १३० दात्यांनी रक्तदान केले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, माजी सरपंच भटू नामदेव माळी, फिरोज काझी, शामकांत ईशी, राजेंद्र पाटील या मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत १४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.प्रवीण सरोदे, प्रा. जी.व्ही.तपकिरे, प्रा. डॉ.विजय पाटील, प्रा. डॉ.सतीष देसले, डॉ. आर.बी.वाघ, प्रा. मिल्केश जैन, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.प्रशांत महाजन उपस्थित होते.

शिरपूर येथील स्व. मुकेशभाई पटेल ब्लड बँकेच्या  सहकार्याने रक्त संकलनाचे कार्य पार पडले. सदर शिबिराचे समन्वयक प्रा. विजय सूर्यवंशी, विद्यार्थी प्रकोष्ठ अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी, एन. एस. एस. एककाचे प्रा.एम.आर.पाटील, प्रा. नितीन शिंदे. प्रा. पी. एस पाटील, प्रा.महेश पाटील, प्रा.अमित महिरे,  प्रा. मनोज पटेल, प्रा.शैलेंद्र परदेशी, प्रा. प्रीती सांजेकर यांनी  शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. शिबिरात आर.सी.पटेल.अभियांत्रिकी महाविद्यालयातील  विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक असे एकूण १३० जणांनी रक्तदान केले.

या व्यतिरिक्त आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात २८७, आर. सी. पटेल आयएमआरडी चे ३५, आर. सी. पटेल सिनिअर कॉलेज व एच. आर. पटेल फार्मसी या दोन महाविद्यालयांचे २२७ व संकुल व एस. व्ही. के. एम. च्या विविध महाविद्यालयात असे एकूण ८४५ दात्यांनी रक्तदान केले.

WhatsApp
Follow by Email
error: