बातमी कट्टा:- माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांचे शिरपूर विमानतळावर स्वागत केले.
तळोदा येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी मुंबई विमानतळावरून शिरपूर विमानतळ येथे मंगळवारी 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:20 वाजता महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांचे आगमन झाले. यावेळी शिरपूर विमानतळावर महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, जि. प. माजी अध्यक्ष तुषारभाऊ रंधे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन प्रभाकरराव चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, प्रा. अरविंद जाधव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, अरुण धोबी, किशोर माळी, हेमंत पाटील, एस. व्ही. के. एम. संस्थेचे चीफ अकाउंटंट अँड ऍडमिनिस्ट्रेटर राहुल दंदे, शिरपूर तालुका, धुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.