आ.जयकुमार रावल यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,सायबर सेलसह एस.पींकडे तक्रार,फेक अकाउंटसह व्हाटसॲप ग्रुपची पोलिस करणार चौकशी

बातमी कट्टा:– आ.जयकुमार रावल यांच्या बददल आक्षेपार्ह पोस्ट करणा-या फेसबुक, इंन्टाग्राम, आणि व्हाटसॲप ग्रुपवर शेअर करणा-या विरोधात शिंदखेडा पंचायत समितीचे उपसभापती दिपक मोरे भिल यांनी तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, सायबर सेल, त्याचप्रमाणे दोंडाईचा शिंदखेडा आणि नरडाणा पोलिस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीव्दारे केली आहे.


त्यांच्या तक्रारीचा आशय असा की, आ.जयकुमार रावल यांचे विरोधक विधानसभेची निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडेल तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाच्या पोस्ट 1.आपलं शिंदखेडा दोंडाईचा”, 2. शिंदखेडा विधानसभा,3. आम्ही दोंडाईचाकर, 4. महाविकास आघाडी शिंदखेडा तालुका, 5. बोल शिंदखेडा बोल या पाचही फेक फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून करीत असून याशिवाय काही विरोधक व्हाटसॲप च्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करीत आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून या गंभीर प्रकाराबाबत तात्काळ गुन्हा दाखल सायबर सेलकडून हे फेक खाते कोण चालविते कुणाच्या व्हाटसॲप वरून हया पोस्ट शेअर होतात त्याची यादी देखील दिपक मोरे यांनी पोलिसांना दिली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: