
बातमी कट्टा:- सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झालेल्या 24 वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 17 रोजी सकाळी घडली आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत मच्छीमारांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 17 रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणीने सावळदे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शिरपूर शहर पोलीस स्टशनचे पोर्णिमा पाटील, अनिता पावरा, यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल होत. तरुणीचा सावळदे गावाजवळील निम्स कॉलेज हद्दीत मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता.मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसांनी सोशल मिडीयावर फोटोसहीत ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानंतर दुपारी तीची ओळख पटली असून तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरणार वय 24 रा.सोनगीर हल्ली मुक्काम साईदर्शन कॉलनी धुळे असे असून नंदिनी खैरणार हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे.नंदिनी खैरणार शिक्षणसंदर्भात नाशिक येथे शिक्षण घेत होत्या.नाशिक येथून काल धुळे येथे घरी आली होते.आज सकाळी मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली मात्र ती परत घरी परतली नाही तीचा शोध सुरु असतांना ती कुठेही मिळुन आली नाही.अखेर सोशल मिडीयावर नंदिनी खैरणार यांची माहिती मिळाल्याचे वडील रवींद्र खैरणार यांनी पोलीसांना सांगितले.नंदिनी खैरणार यांच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ होत.आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.