इनडोअर सराव करण्यास परवानगी द्यावी हीच क्रिडाप्रेमी म्हणून इच्छा…!

लेख बाबत आपल्या प्रतिक्रीया 8975850892 या वॉटसअप क्रमांकावर नक्की सांगा…

कोरोना या आजाराच्या वाढत्या प्रभावामुळे गेले पंधरा ते सोळा महिने क्रीडाक्षेत्र संपूर्णपणे बंद आहे. आता मात्र कोरोना या आजाराचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत ,म्हणूनच अनेक जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात आले आहेत .आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर अनेक जिल्ह्यांमध्ये आता बरंचस सुरळीत पणे सुरू आहे, असे वाटते ! मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अजून देखील बरेचसे निर्बंध लावण्यात आलेले आहेत.


खरे पाहता सरकारने क्रीडाक्षेत्राचा आता गांभीर्याने विचार करायला हवा! अनेक ठिकाणी रुग्ण संख्या कमी झालेली असल्यामुळे आता कमीत कमी इन डोअर खेळांना तरी परवानगी देण्यात यावी ,जसे की बॅडमिंटन ,टेनिस, टेबल टेनिस , बुद्धिबळ ,कॅरम आणि क्रिकेट सारख्या खेळाला देखील इन डोअर क्रिकेट प्रशिक्षण सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी . इन डोअर मध्ये जास्त खेळाडूंची संख्या नसतेच!कारण तिथे नेहमी देखील अनेक निर्बंध असतात, म्हणून अशा ठिकाणी कोरोना या आजाराचा संसर्ग वाढण्याची देखील तेवढी शक्यता नसणार !! खेळाडूंना एकदा जर व्यवस्थित मार्गदर्शन केले तर, नक्कीच ते सर्व काही बंधनं पाळतील ,यात काही शंका नाही. म्हणून आता प्रशासनाने इन डोअर खेळांना शक्य तेवढ्या लवकर परवानगी द्यावी हीच अपेक्षा ! कारण अनेक क्रीडापटूंचे अतोनात नुकसान झालेले आहे .आम्हाला हे नक्कीच मान्य आहे की ,जिवापेक्षा मोठं काही नाही जगात. पण आता फारशी चिंता करण्यासारखे नक्कीच नाही, म्हणून इनडोअर क्रिकेट सराव तसेच इतर खेळांचे सराव करण्यास मुभा देण्यात यावी !!
क्रीडापटूंनी देखील सर्व बंधने व्यवस्थित पाळायला हवीत, जेणेकरून आपल्याला एकमेकांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही ,आणि आपल्यापासून दुसऱ्याला देखील संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी .इनडोअर मध्ये प्रवेश करण्याआधी पासून तर इन डोअर मधून बाहेर पडेपर्यंत लक्षपूर्वक सर्व क्रीडापटूंनी काळजी घ्यावी. जर का आता पावसाळ्यात व्यवस्थित सराव झाला तर जे प्रोफेशनल क्रीडापटू आहेत त्यांना पावसाळा संपल्यानंतर नक्कीच फायदा मिळेल . आपल्या करिअर साठी त्यांना पुढे मार्गक्रमण करता येईल, आणि ते मार्गक्रमण करणे सोपे जावे हीच एक अपेक्षा आहे . म्हणूनच जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सर्व प्रकारचे इन डोअर सुरू करावेत. शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे ,आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी देखील वेळोवेळी क्रीडापटूंना मार्गदर्शन करावे .अनेक क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षक सर्व प्रकारचे खेळ सुरू होण्यासाठी ,आतुरतेने सरकारच्या सकारात्मक निर्णयाची वाट बघत आहेत .
कोरोना या आजाराच्या रुग्णांची संख्या खूपच प्रमाणात वाढत होती म्हणून सर्व काही बंद केल होतं ,पण आता हे बरंचसं नियंत्रणात आलेलं असल्यामुळे ही अपेक्षा करणे वावगे नाही !! अनेक क्रीडापटूंना सध्या भरपूर वेळ मिळत आहे, आणि म्हणूनच ते आपला अमूल्य वेळ इन डोअर मध्ये सरावासाठी देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस तयार करून वेगवेगळे प्रशिक्षक एकाच जागेचा भरपूर प्रमाणात उपयोग करू शकतात .म्हणून खेळाडूंचे, विशेषतः व्यावसायिक खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी इनडोअर सराव करण्यास त्यांना परवानगी द्यावी हीच एक क्रीडाप्रेमी म्हणून इच्छा!!!

डॉ.गोकुलसिंह गिरासे,क्रिकेट समालोचक
9594977577
Email [email protected]

WhatsApp
Follow by Email
error: