इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून दोन घरांमध्ये सुरु होती चौकशी…

बातमी कट्टा:- आयकर विभागाचे अधिकारी सोनगीर येथे दाखल झाले होते.आयकर विभागाच्या पथकाने एकत्र दोन घरांमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी सुरु केली मात्र यात प्रचंड गोपणीयता बाळगल्याने कुठल्या प्रकरणात आयकर अधिकारी चौकशी करत आहेत हे समजू शकले नाही. याबाबत परिसरात “खमंग” चर्चा सुरु होती.

मिळालेल्या माहिती नुसार काल दि 10 रोजी दुपारच्या सुमारास अडीशनल डायरेक्ट ऑफ इन्कम टॅक्स (इव्हीस्टीगेशन नाशिक) फलक लावलेली इनोव्हा कार धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे दाखल झाली होती. यात एकुण आठ अधिकारी होते.यांच्यासह सोनगीर पोलीस अधिकारी देखील येथे उपस्थित झाले होते. आयकर विभागाच्या अधिकारींनी दोन गट करत एकत्र सोनगीर येथील व्यापारी व भिक्षुकी करणारे महाराज या दोघांच्या घरात दाखल झाले. मात्र घरात नेमकी कसली तपासणी केली व काय चौकशी सुरु होती हे बाहेर समजू शकलेले नाही.आयकर विभागाचे पथक गेलेल्या दोन्ही घरांचे दरवाजे बंद होते घरात कागदपत्रांची तपासणी सुरु होती.दुपारी 12 ते रात्री 10:30- 11 वाजेपावेतो उशिरापर्यंत सदर चौकशी सुरु होती असे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोनगीर पोलीस स्टेशन येथे व्यपारी व महाराज यांची जमीन व्यवहाराबाबत तक्रार दाखल होती त्यानंतर आयकर विभागाने काल धाड टाकल्याचे सांगितले जात आहे.घटनास्थळी सोनगीर पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते. अचानक दोन्ही घरांमध्ये आयकर विभागाने धाड टाकल्याने गावपरिसरात चर्चेला उधान आले होते.या कार्यवाही बाबत मात्र काही एक समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: